नमस्कार मित्रांनो, आज आपण शॉप ॲक्ट लायसन्स म्हणजेच (गुमास्ता) दुकानाचा परवाना ऑनलाइन कसा काढायचा how to apply for shop act license in Maharashtra या बद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो उद्योग, व्यवसाय, हॉटेल या कामांसाठी किंवा दुकानांसाठी शॉप ॲक्ट लायसन्स हे खूप आवश्यक असते. ते प्रत्येक दुकानदारा कडे असायला हवे. तुम्ही छोट्या गावात राहत असाल किंवा शहरात राहत असाल, तुमच्या कडे शॉप ॲक्ट लायसन्स हे असायलाच हवे. नाही तर तुमचा व्यवसाय किंवा उद्योगाला कायदेशीर मान्यता प्राप्त नसल्याने भविष्यात खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल
सर्वात आधी आपण बघू की शॉप ॲक्ट लायसन्स म्हणजे नेमकं काय असतं…
शॉप ॲक्ट लायसेन्स म्हणजे काय | What is Shop act License ?
नगरपालिका किंवा महानगरपालिका व इतर क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अॅक्ट लायसेन्स होय यालाच गुमस्ता देखील म्हटले जाते. शॉप ॲक्ट लायसन्स म्हणजे हे लायसन्स तुम्हाला एखाद्या विशिष्ट ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी कायदेशीर परवानगी देते. हे राज्य सरकारच्या दुकान व आस्थापना कायदा च्या अंतर्गत सर्व व्यावसायिक दुकान दारांनी कायद्याने ठरवून दिलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या दुकान दाराने व्यवसाय चालवण्यासाठी कायद्या अंतर्गत नवीन व्यवसायाची नोंदणी करणे व त्याचा परवाना घेणे खूप आवश्यक आहे. शिवाय व्यवसाय/दुकान चालू केल्यावर, नोंदणी अर्ज 30 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे.
शॉप ॲक्ट लायसन का काढावे लागते | Why Shop Act Licence Needed ?
1)कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते.
2)दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यायसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे दाखला ठरतो.
3) व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र जरुरी असते.
4)त्याच प्रमाणे विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे,दुकानाचा विमा इ.सेवांचा लाभ घेण्यासाठी शॉप अॅक्ट लायसेन्स महत्वाचे ठरते.
5) शॉप अॅक्ट लायसेन्स धारकांनाच मुल्यवर्धित कर नंबर काढता येतो.
6) ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप अधिनियमाची आवश्यकता नसते परंतु गावाची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप अधिनियम लागते.
शॉप ॲक्ट लायसेन्स काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Shop Act Licence Maharashtra Documents List in Marathi
- जेथे व्यवसाय सुरु आहे किंवा करावयाचा आहे त्या शॉपचे नावासहीत फोटो
- मालकाचे फोटो
- व्यवसायाच्या ठिकाणचे / जागेवरील घेतलेले लाईट बिल / टेलीफोन बिल भाडेपावती अथवा खरेदीखत
- जागा स्वमालकीची नसेल तर मालकांचे संमतीपत्र.
- नुतनीकरण असल्यास ओरिजनल शॉपअॅक्ट लायसन्स
- आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स.
मित्रांनो आता आपण बघितले की शॉप अॅक्ट लायसेन्स चे महत्व काय आणि त्याचा कशासाठी उपयोग होतो तर चला आता आपण शॉप ॲक्ट लायसन कशाप्रकारे काढू शकतो हे पाहूयात Shop Act License Maharashtra Registration Process Apply Online in Marathi
हे देखील वाचा – ऑनलाइन डिजिटल 7/12 मराठी महाराष्ट्र | Download digital 7/12 online 2022-23
बघा 7/12 8अ ऑनलाइन महाराष्ट्र | Download 7/12 utara in marathi online maharashtra 2022-23
माझी शाळा निबंध मराठी | My School Essay in Marathi 2024
मासिक व्याज मुदत ठेव (FD) म्हणजे काय ?
शॉप अॅक्ट लायसेन्स काढण्याची प्रक्रिया | Shop Act License Maharashtra Registration Process ?
1. मित्रांनो, शॉप ऍक्ट लायसन्ससाठी तुम्हाला सर्वात पहिले “आपले सरकार ही महाराष्ट्र शासन ची aaplesarkar.mahaonline.gov.in वेब साईट ओपन करायची आहे.
2. त्यानंतर New User या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.(तुमचे जर आधीच अकाऊंट असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉगिन करू शकता)
3. यानंतर पर्याय १ निवडा, नंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून, OTP पाठवा या बटन वर क्लीक करा. व पुढच्या बॉक्स मध्ये तुमचा One Time Password म्हणजे OTP येईल तो टाकायचा आहे. व नंतर Username विचारले जाईल तिथे तुमचं एखाद Username तयार करून टाकायचा आहे (कोणतेही इंग्लिश नाव जे तुमच्या लक्षात राहील असे हे नाव unique असले पाहिजे त्यासाठी तुम्ही नंबरचा देखील वापर करू शकता उदा. Rushi9834, payal5489) नंतर ते accept (मान्य) झाल्यावर तुम्हाला खाली पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर तुम्हांला व्यवसाय/दुकान मालकाचे पुर्ण नाव, जन्म तारीख टाकून नोंदणी पूर्ण करायची आहे.
4. आता परत होम पेज वर परत येऊन, तुम्हाला लॉग इन करून बघायचे आहे. त्यासाठी तुम्हांला तुमचे बनवलेले Username आणि बनवलेला पासवर्ड दिलेल्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे. व दिलेला Security Code टाकायचा आहे. व नंतर ज्या जिल्हात तुम्हाला शॉप ऍक्ट लायसन्स काढायचे आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. व लॉग इन या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
5. आता लॉग इन केल्यावर तुमच्या समोर एक नवीन होम पेज ओपन होईल, त्यात सर्च या ऑपशन मध्ये तुम्हांला Shop and establishment registration सर्च करून तो पर्याय निवडायचा आहे.
6. आत्ता तुम्ही नवीन पेज पोहचाल तिथे तुम्हाला दोन ऑपशन दिसतील. जर तुमची कंपनी किंवा संस्था असेल तर ते निवडा किंवा त्यातील Individual ऑपशन निवडा.
7. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजच्या डाव्या बाजूला काही ऑपशन्स दिले आहेत, त्यापैकी Shop and establishment application या ऑपशन वर क्लिक करा. त्याखाली दिलेल्या Application Form या ऑपशन ला सिलेक्ट करा.
8. त्यानंतर तुमच्या समोर दोन ऑपशन दिसतील. त्यात जर तुमच्या व्यवसायात शून्य दे दहा कामगार असतील तर एक नंबर चा ऑपशन निवडायचा आहे. आणि जर 10 पेक्षा जास्त कामगार असतील तर दोन नंबर चा ऑपशन निवडायचा आहे. व नंतर खाली दिलेल्या Confirm या बटन वर क्लीक करायचे आहे.
9. या नंतर “Form F” नावाचा एक नवीन फॉर्म ओपन होईल. (या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्या दुकानाची सर्व माहिती भरायची आहे ती पुढीलप्रमाणे) त्या फॉर्म मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या विभागाचे नाव टाकायचे आहे. त्या नंतर तुमचा जिल्हा व जवळ उपलब्ध असलेले एखादे ऑफिस चे नाव टाकायचे आहे.
(टीप – हा संपूर्ण फॉर्म भरण्याची गरज नाही फक्त जिथे * असे चिन्ह जिथे आहे तेच भरा करणे ते compulsory आहेत व बाकी optional आहेत)
10. त्याखाली तुम्हाला Name of establishment या ऑपशन मध्ये तुमच्या आस्थापनेचे म्हणजेच दुकानाचे नाव टाकायचे आहे.
त्या नंतर Previous details of establishment या ऑपशन मध्ये तुमच्या तुमच्या दुकानाची पूर्वीची काही माहिती असेल तर ती भरायची आहे. आणि जर तुम्ही नवीन रेजिस्ट्रेशन करत असाल तर New Registration हा पर्याय निवडायचा आहे. (येथे तुमचे जर जुने शॉप अॅक्ट लायसेंस असेल तर Renewal हे ऑप्शन सिलेक्ट करा)
त्या खाली Address of establishment या ऑपशन मध्ये तुमच्या आस्थापनेचा म्हणजे दुकानाचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. यात तुमच्या गाव, जिल्हा, तालुका, राज्य वगैरे सिलेक्ट करायचे आहे. तसेच पिन कोड, मोबाईल नंबर, व इ मेल आयडी टाकायचा आहे. तसेच तुमचे दुकान Rent (भाडयावर) वर आहे की Self owner (स्वतःची मालकी) आहे ते टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा व्यवसाय सुरू करण्याची तारीख टाकायची आहे.
त्यानंतर Nature of business या ऑपशन मध्ये तुमच्या व्यवसायाचे स्वरूप म्हणजे तुमचा व्यवसाय प्रायव्हेट आहे की पब्लिक सेक्टर मध्ये आहे ते निवडायचे आहे.
आता खाली Man power / Worker details या ऑपशन मध्ये तुम्हाला तुमच्या कडे किती कामगार आहेत त्यांची माहिती भरायची आहे. त्यात स्त्रीयांची संख्या, पुरुषांची संख्या, तसेच इतर Transgender असतील तर त्यांची संख्या टाकायची आहे. जर तुमच्याकडे कामगार नसतील तर बाकीच्या बॉक्स मध्ये 0 संख्या टाका नाहीतर फॉर्म पुढे proceed होणार नाही.
त्यानंतर Name of employer या ऑपशन मध्ये दुकान मालकाचे संपूर्ण नाव टाकायचे आहे.
Residential address of employer या ऑपशन मध्ये दुकान मालकाचा रहिवासी पत्ता म्हणजे घरचा पत्ता टाकायचा आहे, सोबतच मालकाचा मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, ई-मेल आई डी वगैरे माहिती भरून नंतर तुमचे Status/Designation टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही त्या दुकानाचे मालक म्हणजे owner (मालक) आहेत की मॅनेजर आहात ते टाकायचे आहे.
Name and residential address of Manager या ऑपशन मध्ये जर दुकानात कोणी मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक असेल तर त्याचे संपूर्ण नाव व पत्ता टाकायचा आहे.
ही माहिती फार महत्वाची आहे येथे तुम्हाला Category of establishment टाकायची आहे. यात तुमच्या दुकानाचा प्रकार म्हणजे तुमचे दुकान आहे की उपहार गृह, निवासी हॉटेल, थिएटर, सार्वजनिक मनोरंजनाची किंवा करमणुकीची जागा आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमचं दुकान कशाचं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
त्यानंतर Type of organisation या ऑपशन मध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा प्रकार टाकायचा आहे. जसे की मालक, भागीदारी, संस्था, मंडळ, कंपनी वगैरे.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या दुकानात काम करत असलेल्या कामगारांची तसेच तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती तिथे काम करत असेल तर त्याचे नाव टाकायचे आहे. व परत एकदा पुरुष कामगार व स्रिया कामगार ची संख्या टाकायची आहे.
11. वरील सर्व माहिती भरल्यानंतर दिलेली Self declaration माहिती वाचून ‘I Agree’ या ऑपशन वर क्लीक करायचे आहे. त्यानांतर Save Details या बटन वर क्लिक करा.
जर तुम्ही योग्य माहिती भरली असेल तर
तुमची सर्व माहिती सेव्ह होईल तुमच्यासमोर एक मेसेज येईल त्यामध्ये तुमचा अँप्लिकेशन आयडी असेल.
(टीप – जर तुमच फॉर्म शेव होत नसेल तर शेव बटन वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं फॉर्म कुठे भरायचा राहिला आहे किंवा काय error आहे ते खाली लाल अक्षरात दिसेल)
12. आता या नंतर तुम्हाला documents अपलोड करायचे आहे. त्यासाठी upload documents या ऑपशन वर क्लीक करा.
क्लीक केल्यावर तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत व त्यांची साईझ काय असावी या बद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. त्याप्रमाणे तुमचे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. त्यात तुमचा फोटो, सही सांगितलेल्या साईझ मध्ये टाका.
13. काही कारणामुळे तुमचे अकाउंट लॉग ऑऊट झाले तर परत लॉगिन करा. लॉगिन केल्यावर तुमच्यासमोर एक टेबल दिसेल (तुमच्या अर्जाचा आढावा), तुमचा फॉर्म पुढे भरणे चालू ठेवण्यासाठी पुढे जा बटन वर क्लिक करा
आता पेज च्या डाव्या बाजूला असलेल्या self declaration या ऑपशन वर क्लीक केल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म म्हणजे स्वघोषणापत्र ओपन होईल.
त्यावर मालकाची सही करून ते स्कॅन करून डॉक्युमेंट मध्ये अपलोड करायचे आहे. त्यासोबतच तुमचे आधार कार्ड, दुकानाचा मराठीत पाटी असलेला फोटो, तुमचा फोटो, व सही हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे.
14. Documents successfully अपलोड झाल्यावर आता तुम्हाला पेमेंट करायचे आहे. इथे तुम्हाला पेमेंट हा GST धरून फक्त 23 रुपये द्यायचे आहेत. त्यानंतर confirm या बटन वर क्लिक करायचे आहे.
पेमेंट करण्यासाठी इथे तुम्हाला अनेक ऑपशन दिले जातील, त्यापैकी नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, वॉलेट किंवा यूपीआई असा कोणताही पर्याय निवडून तुम्ही पेमेंट करू शकता
पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमचं शॉप ॲक्ट लायसन्स हे तयार होईल त्याची रिसीट म्हणजेच पावती तुम्हाला तिथे दाखवली जाईल. त्या पावतीची तुम्ही प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवू शकता.
15. आता परत यायचं आहे. व तिथे तुम्हाला Download form आणि Download intimation असे पर्याय दिसतील. हे दोन्ही पर्याय डाउनलोड करायचे आहे. तसेच यातले जे इंटिमशन रीसिप्टआहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे. व त्यानंतर तुमच्या शॉप चे लायसन्स तुमच्या समोर डिस्प्ले होईल. त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण शॉप ॲक्ट लायसन्स हे फक्त तेवीस रुपयात ऑनलाइन पद्धतीने कसे काढायचे ते जाणून घेतले. मित्रांनो, ग्राम पंचायत असो, नगर परिषद असो किंवा महानगरपालिका असो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात दुकानाचे शॉप ॲक्ट लायसन्स काढणे खूप बंधन कारक आहे. कारण ग्राम पंचायत अधिकारी किंवा जिल्हा अधिकारी चौकशीसाठी आले तर त्यांना शॉप ऍक्ट लायसन्स दाखवणे बंधनकारक आहे. त्यामुळे जर तुमचे दुकान असेल तर तुमच्या कडे शॉप ऍक्ट लायसन्स हे असेलच पाहिजे.
मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल व हा लेख महत्त्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद!
हे देखील वाचा –
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2024-25 | Namo Shetakri Yojana
सहारा इंडिया पैसा कब मिलेगा | Sahara India Refund 2024
अधिक मास: हिंदू धर्मातील एक पवित्र महिना |मराठी माहिती
ताज्या मराठी बातम्या अॅप|Best Apps for Marathi News e-paper 2024
- आंखों के नीचे काले घेरे हटाने के घरेलू उपाय: प्राकृतिक और प्रभावी तरीके
- How to Create Life in Infinite Craft: The Ultimate Guide (2024)
- एयरटेल सहायता सेवा: संपर्क जानकारी और ग्राहक सहायता विवरण 2024
- कर्मचारी भविष्य निधि संगठन (EPFO) से जुड़ी खबरें
- भारत में मतदान करने के लिए पंजीकरण कैसे करें 2024-25
तुम्हाला जर हा लेख महत्व पुर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा.
दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) महाराष्ट्र ऑनलाइन प्रक्रिया 2024-25: सामान्य प्रश्न (FAQs)
प्रश्न 1. दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) काय आहे?
उत्तर: दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) हा महाराष्ट्रातील दुकानदारांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेला परवाना आहे. हा परवाना कामगार कायदा, 1934 आणि महाराष्ट्र दुकान कर्मचारी कायदा, 1948 अंतर्गत आवश्यक आहे.
प्रश्न 2. मला दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) का घ्यावा लागेल?
उत्तर: तुम्ही महाराष्ट्रात कोणतीही दुकान, व्यापारी प्रतिष्ठान किंवा व्यवसाय चालवत असल्यास तुम्हाला दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) घेणे आवश्यक आहे. यात किरकोळ दुकानं, फास्ट फूड रेस्टॉरंट, कारखाने आणि इतर अनेक प्रकारचा समावेश आहे.
प्रश्न 3. दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) कसा मिळवायचा?
उत्तर: तुम्ही दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज:
श्रम आणि कामगार कल्याण विभागाच्या https://lms.mahaonline.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.
“दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता)” साठी ऑनलाइन अर्ज निवडा.
आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जमा करा.
शुल्क भरा.
तुमचा अर्ज सबमिट करा.
ऑफलाइन अर्ज:
तुमच्या जवळच्या श्रम आणि कामगार कल्याण कार्यालयाला भेट द्या.
दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) साठी अर्ज फॉर्म मिळवा.
आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जमा करा.
शुल्क भरा.
तुमचा अर्ज सबमिट करा.
प्रश्न 4. दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) मिळवण्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) मिळवण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे जमा करावी लागतील:
ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
पत्ता पुरावा (विद्युत बिल, गॅस बिल, आधार कार्ड इ.)
व्यवसायाचे नाव आणि पत्ता
व्यवसायाचा प्रकार
कर्मचाऱ्यांची संख्या
शुल्काची रक्कम
प्रश्न 5. दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) साठी शुल्क किती आहे?
उत्तर: दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) साठी शुल्क दुकानदारांच्या वार्षिक उलाढालीच्या आधारावर बदलते. तुम्ही अधिक माहितीसाठी श्रम आणि कामगार कल्याण विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.
प्रश्न 6. दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) किती काळासाठी वैध आहे?
उत्तर: दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) एक वर्षासाठी वैध आहे आणि दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
प्रश्न 7. दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) नूतनीकरण कसे करायचे?
उत्तर: तुम्ही दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) ऑनलाइन किंवा ऑफलाइन नूतनीकरण करू शकता. ऑनलाइन आणि ऑफलाइन नूतनीकरणासाठीची प्रक्रिया अर्ज करण्याच्या प्रक्रियेसारखीच आहे. फक्त तुम्हाला तुमचा आधील वर्षाचा परवाना क्रमांक आणि इतर काही अतिरिक्त माहिती जमा करावी लागेल.
प्रश्न 8. दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) नसल्यास काय होऊ शकते?
उत्तर: दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) नसल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. दंडाची रक्कम तुमच्या व्यवसायाच्या आकारावर अवलंबून असते. तुमच्यावर व्यवसाय बंद करण्याचा आदेशही निघू शकतो.
प्रश्न 9. मी ऑनलाइन अर्ज करताना अडचणींमध्ये अडलो तर काय करावे?
उत्तर: तुम्ही ऑनलाइन अर्ज करताना अडचणींमध्ये अडलो तर तुम्ही श्रम आणि कामगार कल्याण विभागाच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधू शकता किंवा विभागाच्या वेबसाइटवरील ” संपर्क ” विभागातून मदत घेऊ शकता.
प्रश्न 10. दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) बद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?
उत्तर: दुकानदार कायदा परवाना (गुमास्ता) बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संसाधनांचा वापर करू शकता:
श्रम आणि कामगार कल्याण विभागाची वेबसाइट: https://lms.mahaonline.gov.in/
तुमच्या जवळच्या श्रम आणि कामगार कल्याण कार्यालय
टीप: ही FAQ सर्वसाधारण माहिती प्रदान करते. तुमच्या विशिष्ट परिस्थितीनुसार तुम्हाला काही अतिरिक्त माहिती किंवा मार्गदर्शन आवश्यक असू शकते. अधिक माहितीसाठी कायदेशीर सल्लागार किंवा श्रम आणि कामगार कल्याण विभागाशी संपर्क साधण्याची शिफारस केली जाते.
1 thought on “शॉप ॲक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे | Shop Act License (Gumasta) Maharashtra Online Process 2024-25”