फूड लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे |FSSAI | Food License Online Registration 2023-24

फूड लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे | Food License Online Registration 2023-24 | FSSAI फूड परवाना/नोंदणी in Marathi Food License म्हणजे खाद्य परवाना कसे काढायचे हे आपण या लेखामधे बघणार आहोत तसेच सर्वात आधी फूड लायसेंस का महत्वाचे आहे आणि त्याचा फायदा काय हे आपण पाहूया ज्या प्रमाणे आपण शॉप अॅक्ट लायसेंस ऑनलाइन काढतो त्याच प्रमाणे आपण फूड लायसेंस साठी देखील आपण घरबसल्याऑनलाइन फॉर्म भरु शकतो.

Food License Online Registration in Marathi | food license documents in marathi

Table of Contents

फूड लायसेंस का व कोठे गरजेचे आहे ? | FSSAI लायसेंस

ज्या ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना FSSAI फुड लायसन्स परवाना बंधनकारक आहे.मित्रांनो, ज्या प्रकारे कोणत्याही दुकानासाठी टाकण्यासाठी शॉप ऍक्ट लायसन्सची आवश्यकता असते, त्याच प्रकारे ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ विकले जातात त्यासर्वांना फूड लायसन्स ची गरज असते. मित्रांनो, तुम्ही ही जर एखादे हॉटेल, बेकरी किंवा एखादा फूड व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे ही फूड लायसन्स असणे खूप आवश्यक आहे.

FSSAI नोंदणी (अन्न परवाना) Food License काय आहे? | What is Food License

FSSAI – भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहे ज्या अंतर्गत FSSAI स्थापन करण्यात आले आहे.

FSSAI परवाना किंवा FSSAI नोंदणी कोणत्याही अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक आहे. FSSAI नोंदणी सर्व खाद्यपदार्थ संबंधित व्यवसायांसाठी आवश्यक आहे. एक 14 अंकी नोंदणी/परवाना क्रमांक पैकिंग छापलेले किंवा व्यवसायाच्या आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

FSSAI नोंदणी/परवाना कोणासाठी आवश्यक आहे ? | Importance of FSSAI

  • डेअरी युनिट 
  • तेल प्रोसेसिंग युनिट
  • कत्तलखाणा मांस प्रक्रिया युनिट 
  • Relabellers आणि Repackers  
  • प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट
  • स्टोरेज यूनिट
  • घाऊक विक्रेता,किरकोळ विक्रेता,वितरक,पुरवठादार
  • ढाबा,खानावळ,क्लब/कँटीन,
  • अन्न कॅटरिंग,
  • हॉटेल,उपहारगृह Restaurant
  • खाद्यपदार्थ दुध वाहतुक
  • Marketer
  • फेरीवाला
  • निर्यातकार आणि आयातकार
  • E-commerce / Online Food Delivery
  • फास्ट फूड,चायनीज सेंटर

FSSAI नोंदणी/परवाना प्रकार | FSSAI Food License Types

FSSAI नोंदणी

 -ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना fssai नोंदणी आवश्यक

FSSAI State License

ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आणि 20 कोटीपर्यंत आहे त्यांना fssai state license आवश्यक.

-उत्पादन युनिट दररोज 2 टन पर्यंत क्षमतेचे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज 50000 लिटर,

3 स्टार तारांकित हॉटेल्स आणि वरील, repackers आणि relebelling युनिट, क्लब उपाहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी राज्य परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

FSSAI Central License

-ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना fssai central license आवश्यक -निर्यातकार आणि आयातकार आणि Ecommerce यांना FSSAI Central License

FSSAI नोंदणी परवाना साठी आवश्यक कागदपत्रे | Food License documents in marathi

Basic नोंदणी प्रमाणपत्र

  •   1.आधार कार्ड/पॅन कार्ड
  •    2.पासपोर्ट साईज फोटो
  •    3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट

FSSAI State/Central License

  •    1.आधार कार्ड/पॅन कार्ड
  •    2.पासपोर्ट साईज फोटो
  •    3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट
  •    4. पाणी तपासणी अहवाल (for Manufacturer and Hotel Restaurant )
  •    5.अन्न वर्ग यादी,उपकरणे यादी, यूनिटचा फोटो
  •    6.ब्लू प्रिंट (For Manufacturer processor only)
  •    7.ईतर (व्यवसायानुसार)

ऑनलाइन फूड लायसेंस कसे काढायचे? | Apply for Food License

ज्या प्रमाणे आपण घरबसलल्या आपले शॉप अॅक्ट लायसेंस काढू शकतो तसेच आपण FSSAI फूड लायसेंस देखील काढू शकतो

फूड लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे |FSSAI |  Food License Online Registration 2023-24
  • आता या नंतर तुम्हाला तुमची योग्य ती माहिती भरायची आहे जसे की  Manufacturer, Trade /Retailer, Food services, Central government agencies, Head office असे ऑप्शन दिसतील. त्यातील तुमचा जो बिझनेस असेल तो सिलेक्ट करा
फूड लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे |FSSAI |  Food License Online Registration 2023-24  in Maharashtra
  • समजा तुम्ही किराणा चे दुकान टाकणार असाल तर तुम्ही Trade /Retailer हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा वार्षिक उलाढाल (Turnover) किती आहे ते सिलेक्ट करायचे आहे. व नंतर Proceed ऑप्शन वर क्लिक करायच आहे.
  • आता नेक्स्ट पेज वर You are eligible for State License, Click here to proceed असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
फूड लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे |FSSAI |  Food License Online Registration 2023-24  in Marathi Maharashtra
  • मित्रांनो, आता तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल ‘Form A’. त्यातील सर्व डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. त्यात सर्वात पहिले Applicant details मध्ये तुम्हाला तुमचे नाव आणि शॉप चे नाव टाकायचे आहे. त्यानंतर Designation (कोणत्या प्रकारचे दुकान/व्यवसाय आहे) सिलेक्ट करायचे आहे. यात तुम्ही Individual आहात की Partnership की Proprietor आहात ते सिलेक्ट करायचे आहे.
  • आता पुढे तुम्हाला तुमचा बिझनेस अड्रेस टाकायचा आहे. म्हणजेच तुमचा फूड बिझनेस ज्या ठिकाणी आहे टोटल पत्ता टाकायचा आहे. त्या नंतर तुमचा निवासी पत्ता व बिझनेस चा पत्ता एसच आहे का ते विचारले जाईल. जर दोन्ही पत्ते एकच असतील तर Yes ऑप्शन वर टिक करा. व जर पत्ता एकच नसेल तर No ऑप्शन वर टिक करा
  • आता तुम्हाला तुमचा Correspondence address म्हणजे जिथे तुम्ही राहताय तिथला पत्ता टाकायचा आहे.
  • त्यानंतर Contact Details मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी टाकायचा आहे. व नंतर Contact Person चे नाव टाकायचे आहे. आता तुम्हाला किती वर्षांसाठी लायसन्स काढायचे आहे ते सिलेक्ट करायचे आहे. ही संपूर्ण माहिती अचूक भरा कारण हीच माहिती तुमच्या लायसेंस वर असेल
  • आता तुम्हाला Food कॅटेगरी मध्ये तुम्ही तुमच्या दुकानात कोण कोणते फूड ठेवणार आहात ते ऍड करायचे आहे. त्यानंतर Other Details मध्ये वॉटर सप्लाय चा सोर्स सिलेक्ट करायचा आहे. व नंतर Save and next बटन वर क्लिक करायचे आहे.
फूड लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे |FSSAI |  Food License Online Registration 2023-24
  • मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Sign up details टाकायचे आहेत त्यात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, ई-मेल आयडी, व belongs to टाकायचे आहे. तसेच सेकंडरी कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील तर ते टाका, व त्या नंतर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. व दिलेला कॅपचा टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या मोबाईल नंबर व ई-मेल वर एक ओटीपी पाठवला जाईल तो टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमचे रेजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल व तुम्हाला एक आयडी मिळेल तो सेव्ह करून ठेवायचा आहे. व नंतर Ok बटन वर क्लिक करायचे आहे.
  • आता या नंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत व पेमेंट करायचे आहे. इथे तुम्हाला तुमचा फोटो, ओळखीचा पुरावा व प्रीमायसेस (दुकानाच्या आसपासचा) चा फोटो असे कागदपत्रे अपलोड करावे लागेल.
  • वरती मी फूड लायसेंस कागदपत्रे दिले आहेत डॉक्युमेंट्स मध्ये सर्वात पहिले तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो जास्तीत जास्त 3mb पर्यंत व jpeg फॉरमॅट मध्ये असावा. आता आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, वॉटर कार्ड,पासपोर्ट वगैरे यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता.
  • आता तुम्हाला Other Documents या ऑप्शन मध्ये यायचे आहे. तिथे तुम्हाला View mandatory documents ऑप्शन वर क्लिक करून मग New registration ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे कोण कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते बघायला मिळते.
  • आता तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे आहे. मित्रांनो जर तुम्ही एक वर्षासाठी लायसन्स काढत असाल तर तुम्हाला 100 रुपये फी असेल व जर पाच वर्षांसाठी लायसन्स काढत असाल तर तुम्हाला 500 रुपये भरावे लागतील. तर हे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला Online payment या ऑप्शन वर टिक करायचे आहे.
  • आता खाली तुम्ही Preview application या ऑप्शन वर वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमच्या समोर तुमचे पूर्ण ऍप्लिकेशन ओपन होईल. त्यातली माहिती तुम्ही ते पुन्हा एकदा चेक करू शकता. व काही करेक्शन असतील तर ते पुन्हा एडिट करू शकता.यानंतर तुम्हाला Pay ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  •  त्या नंतर तुमच्या समोर एक pdf ओपन होईल. हा pdf म्हणजे रिसीट आहे. जी तुम्हाला डाउनलोड करून जपून ठेवायची आहे. मित्रांनो, यातच तुम्हाला एक ऍप्लिकेशन आयडी मिळेल जो कॉपी करून होम पेज वर यायचे आहे. व ऍप्लिकेशन स्टेटस चेक करायचे आहे. याच नंबर ने तुम्ही तुमच्या लायसेंस चे स्टेटस चेक करू शकता

Renew Food License | FSSAI नुतनीकरण

  • FSSAI फूड लायसन्सच्या उशीरा नूतनीकरणाची फी टाळण्यासाठी परवान्याची मुदत संपण्यापूर्वी 30 दिवस आधी तुम्ही FSSAI नोंदणी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मुदत संपण्याच्या 30 दिवस आधी नूतनीकरण केले नाही तर मुदतीच्या संपण्याच्या दिवसापर्यंत ₹100 दर दिवस दंड म्हणून भरावे लागतात.
  • मुदत संपल्यानंतर FSSAI नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण करता येत नाही
  • मुदत संपल्यानंतर फुड लायसन्स साठी नवीन अर्ज करावा लागतो याची नोंद घ्यावी.

हे देखील पहा –

FSSAI परवाना फायदे काय आहेत? | Benefits of FSSAI Food License

  • अन्न व्यवसाय अनेक कायदेशीर सरकारी लाभ मिळू शकतात.
  • ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करता येते.
  • आपण FSSAI लोगो ग्राहकांना आपापसांत एक सदिच्छा तयार करू शकता
  • अन्न सुरक्षा सुविधा होते.
  • संशोधन आणि विकास क्षेत्रातील सुरक्षा राखण्यासाठी जबाबदार आहे.
  • या लायसेंस ने पूर्ण भारतभर व्यवसाय विस्तार करण्याची एक मोठी संधी उपलब्ध होते.

तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण बघितले की Registration FSSAI Food License | फूड लायसेंस कसे काढायचे 2023 in Marathi त्यासाठी लागणारे Food License Documents, त्याचे महत्व आणि त्याचे फायदे काय आहे तर मग पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन माहिती सह तो पर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र !!!

What is FSSAI ?

FSSAI stands for Food Safety and Standards Authority of India.

फूड लायसेंस साठी लागणारे डॉक्युमेंट | Documetns for FSSAI Food License 2023

1.आधार कार्ड/पॅन कार्ड
   2.पासपोर्ट साईज फोटो
   3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट
   4. पाणी तपासणी अहवाल (for Manufacturer and Hotel Restaurant )
   5.अन्न वर्ग यादी,उपकरणे यादी, यूनिटचा फोटो
   6.ब्लू प्रिंट (For Manufacturer processor only)
   7.ईतर (व्यवसायानुसार)

FSSAI परवाना फायदे काय आहेत? | Benefits of FSSAI Food License

अन्न व्यवसाय अनेक कायदेशीर सरकारी लाभ मिळू शकतात.
ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करता येते.
आपण FSSAI लोगो ग्राहकांना आपापसांत एक सदिच्छा तयार करू शकता
अन्न सुरक्षा सुविधा होते.
संशोधन आणि विकास क्षेत्रातील सुरक्षा राखण्यासाठी जबाबदार आहे.
या लायसेंस ने पूर्ण भारतभर व्यवसाय विस्तार करण्याची एक मोठी संधी उपलब्ध होते.

How to Renew Food License | FSSAI नुतनीकरण ?

FSSAI फूड लायसन्सच्या उशीरा नूतनीकरणाची फी टाळण्यासाठी परवान्याची मुदत संपण्यापूर्वी 30 दिवस आधी तुम्ही FSSAI नोंदणी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मुदत संपण्याच्या 30 दिवस आधी नूतनीकरण केले नाही तर मुदतीच्या संपण्याच्या दिवसापर्यंत ₹100 दर दिवस दंड म्हणून भरावे लागतात.

Fees for FSSAI Food License | फूड लायसेंस शुल्क 2023 ?

मित्रांनो जर तुम्ही एक वर्षासाठी लायसन्स काढत असाल तर तुम्हाला 100 रुपये फी असेल व जर पाच वर्षांसाठी लायसन्स काढत असाल तर तुम्हाला 500 रुपये भरावे लागतील.

फूड लायसेंस ऑनलाइन कसे अप्लाय करावे ?| How to apply for Food License 2023

जर तुम्ही आमची पोस्ट पूर्ण वाचली असेल तर तुम्हाला लायसेंस कसे काढायचे हे समजेल.
official website of FSSAI – https://foscos.fssai.gov.in/

FSSAI नोंदणी/परवाना प्रकार | FSSAI Food License Types

फूड लायसेंस हे दोन प्रकारचे आहे 1) State Food License 2) Central Food License अधिक माहिती साठी आमची पोस्ट read करा.

हे देखील वाचा –

प्रेमानंद जी महाराज: त्याग, भक्ति और प्रेम की त्रिवेणी में डूबी एक अद्भुत आध्यात्मिक यात्रा 2024

पीएम किसान सम्मान निधि चेक मोबाइल नंबर |बेनिफिशियरी स्टेटस| PM Kisan Yojana 2024

सहारा इंडिया पैसा कब मिलेगा | Sahara India Refund 2024

अधिक मास: हिंदू धर्मातील एक पवित्र महिना |मराठी माहिती