Police Verification Maharashtra Apply Download | चारित्र्य पडताळणी दाखला नोकरभरती तसेच विविध कामानिमित्ताने लागणाऱ्या चारित्र्य पडताळणीच्या दाखल्याकरिता तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन डाऊनलोड pdf 2024 परंतु आजही अनेकांना याबद्दल माहिती नसल्याने निरर्थक त्रास सहन करत असतात. निमशासकीय, खाजगी संस्था इ. मध्ये नोकरीकरिता वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे अत्यंत गरजेचे असते.
How is character verification certificate approved?| चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रास मंजुरी कशी मिळते?
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर सदर अर्ज आपल्या लोकल पोलीस स्टेशन मध्ये ते जातो हे पोलिस स्टेशन तुम्ही फॉर्म भरताना निवडू शकता त्या ठिकाणी अर्जदाराने भरलेला फॉर्म त्याला जोडलेले कागदपत्रे याची पडताळणी केली जाते. आणि तसेच सदर अर्जदारावर किंवा • इसमावर काही गुन्हा दाखल झाले आहेत की नाही याची शहानिशा केली जाते त्यानंतर सदर अर्ज संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात जाते. त्यानंतर आपल्या अर्जाची त्या ठिकाणी पुनर पडताळणी होऊन सर्व योग्य असल्यास आपल्या अर्जास मंजुरी मिळते आणि आपल्याला चारित्र्य पडताळणी दाखला मिळते.
चारित्र्य पडताळणी दाखला केव्हा मिळत नाही व का मिळत नाही?
अर्जदाराने चारित्र्य पडताळणी प्रमाण पत्रासाठी ज्यावेळी अर्ज करतात त्यावेळी अर्जामध्ये योग्य माहिती भरावी लागते. फॉर्म भरताना काही चुका झाल्यास किंवा चुकीची कागदपत्रे सोडल्यास अशावेळी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हा मिळत नाही.
पूर्वी चारित्र्याचा दाखला मिळवण्यासाठी पोलिसांच्या तीन ते चार वेबसाइटवरुन फॉर्म भरून त्यांची प्रिंट काढावी लागत होती. त्यानंतर मिळालेल्या तारखेला विशेष शाखा येथे जाऊन फॉर्म आणि कागदपत्रे जमा करणे सक्तीचे होते. त्यानंतर ३ ते ४ दिवस संबंधित पोलिस ठाण्यात चारित्र्य पडताळणीच्या अहवालासाठी उपस्थित राहावे लागत असे. त्यानंतर ३० दिवसांनी नागरिकांना चारित्र्याचा दाखला मिळत होता. मात्र आता ऑनलाइन पद्धतीमुळे ही प्रक्रिया जलद झाली आहे.
Documents for Character Certificate | चारित्र्य पडताळणी दाखला साठी लागणारे कागदपत्रे
- वयाचा पुरावा (कोणताही 1)
a शाळा सोडल्याचा दाखला
b एससी बोर्ड प्रमाणपत्र
c महानगरपालिका किंवा स्थानिक संस्थेने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र
2. ओळख पुरावा: (कोणताही 1)
a पॅन कार्ड
b निवडणूक कार्ड
c वाहन चालविण्याचा परवाना
d विद्यार्थी कार्ड
e पोलिस स्टेशनद्वारे निर्दिष्ट केलेले इतर कोणतेही
३.पत्त्याचा पुरावा : (कोणताही 1)
a पासपोर्ट
b अर्जदाराचे नाव आणि पत्ता दर्शवणारे शिधापत्रिका
c सध्याचे इलेक्ट्रिक/टेलिफोन बिल अर्जदाराचे नाव आणि पत्ता दर्शवित आहे
d सोसायटीचे पत्र
e नोंदणीकृत रजा आणि परवाना
f आधार कार्ड (UID)
4.अनिवार्य दस्तऐवज(Compulsory)
a एनओसीसाठी कंपनीचे पत्र/आयुक्त/पोलीस अधीक्षकांना अर्ज
Apply Process for Character Certificate 2024-25 | चारित्र्य पडताळणी दाखला
स्टेप 1 – या अधिकृत वेबसाईट ला जावा https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx
Police Verification Maharashtra Apply Download | चारित्र्य पडताळणी दाखला
स्टेप 2 – इथे Registration वर क्लिक करा आणि तुमची संपूर्ण माहीती भरा (इथे आधार कार्ड नंबर टाकू नका) फक्त * मार्क असलेली माहिती भरा.
स्टेप 3 – त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर ला OTP येईल तो टाकून Registration process पूर्ण करा. व लॉगिन करा.
स्टेप 4 – इथे तुम्हाला Services मध्ये Character Certificate वर क्लिक करा. (येथे तुम्हाला अजून दोन option दिसतील जर तुम्हाला Security Guard म्हणून काम करत असाल तर ते option निवडा आणि जर तुम्ही परदेशी जाणार असाल तर Passport साठी Police Clearance Certificate : ABROAD हे निवडा )
स्टेप 5 – यानंतर Next वर क्लिक करून संपूर्ण माहिती अचूक भरा (याचा आम्ही एक विडियो केला आहे तो तुम्ही पाहू शकता)
स्टेप 6 – माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचे Local पोलिस स्टेशन निवडायचे आहे याच पोलिस स्टेशन मध्ये तुमचे Application पडताळणी साथी जाणार आहे.
स्टेप 7 – पुढे तुम्हाला Document अपलोड करायचे आहेत तुमचा पासपोर्ट साईज फोटो हा 160px X 200px व 5kb ते 20kb मध्ये असावा आणि तुमची सही ही 256px X 64px व 5kb ते 20kb मध्ये असावी हे डॉक्युमेंट Resize करण्यासाठी तुम्ही या वेबसाइट चा वापर करू शकता.
बाकीचे सर्व डॉक्युमेंट हे JPG format मध्ये 75kb ते 100kb च्या आत असायला हवेत.
स्टेप 8. Document upload नंतर तुम्हाला पेमेंट करावा लागेल आणि त्यानंनातर तुम्ही पुन्हा login करून Download section मध्ये Print application वर क्लिक करू शकता.
स्टेप 9 आता शेवटी तुम्हाला तुमच्या Application ची प्रिंट आणि अपलोड केलेले कागदपत्रे या सगळ्यांची एक एक झेरॉक्स पोलिस मध्ये जावून द्यावी लागते तेथे तुमचे Physical Verification होईल व त्यानंतर काही दिवसात तुम्हाला मोबाइल वर मेसेज येईल Application Approved चा
नंतर पुन्हा लॉगिन करून तुम्ही Download सेक्शन मध्ये Print Certificate वर क्लिक करून तुमचा चारित्र्य पडताळणी दाखला काढू शकता.
चारित्र्य पडताळणी दाखला डाऊनलोड
स्टेप 1 – या अधिकृत वेबसाईट ला जावा https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx
स्टेप 2 – Login करा व Download ऑप्शन मध्ये Print Certificate वर क्लिक करा.
मी आशा करतो की हे लेख आपल्याला महाराष्ट्रात पोलीस सत्यापन प्रमाणपत्र (चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र) कसे मिळवायचे याबद्दल माहिती देण्यास मदत करते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रक्रिया आणि आवश्यकता वेळोवेळी बदलू शकतात, म्हणून अद्ययावत माहितीसाठी तुम्ही नेहमी संबंधित अधिकाऱ्यांचा संपर्क साधावा.
हे देखील वाचा –
ऑनलाइन डिजिटल 7/12 मराठी महाराष्ट्र | Download digital 7/12 online 2024-25
प्रधान मंत्री कृषि सिंचाई योजना से जुड़ी खबरें 2024
महात्मा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण माहिती मराठी 2025
कर्ज मुक्ति अभियान फॉर्म online apply | सावधान रहें ! 2024-25
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):
प्रश्न 1: पोलीस सत्यापन प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर: अर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 15 ते 30 दिवस लागतात. तथापि, हे वेळ पोलिसांच्या सत्यापन प्रक्रियेवर अवलंबून आहे.
प्रश्न 2: मला पोलीस सत्यापन प्रमाणपत्रासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
उत्तर: आवश्यक कागदपत्रांमध्ये ओळखपत्र, आधार कार्ड, पत्ता पुरावा आणि निवास प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. तुम्हाला तुमच्या विशिष्ट गरजेनुसार अतिरिक्त कागदपत्रे जमा करावी लागू शकतात.
प्रश्न 3: मी पोलीस सत्यापन प्रमाणपत्राची स्थिती कशी तपासू शकतो?
उत्तर: तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन किंवा संबंधित अधिकाऱ्यांचा संपर्क करून तपासू शकता.
प्रश्न 4: मला पोलीस सत्यापन प्रमाणपत्रासाठी शुल्क द्यावे लागेल का?
उत्तर: होय, तुम्हाला अर्ज शुल्क आणि सत्यापन शुल्क द्यावे लागेल. शुल्काची रक्कम राज्य आणि अर्जाच्या प्रकारानुसार बदलू शकते.
प्रश्न 5: मला पोलीस सत्यापन प्रमाणपत्र कुठे मिळेल?
उत्तर: तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमधून किंवा ऑनलाइन पोलीस सत्यापन प्रमाणपत्र मिळवू शकता.
टीप: हे फक्त काही सामान्य प्रश्न आहेत. तुम्हाला असलेल्या कोणत्याही इतर प्रश्नांसाठी तुम्ही नेहमी संबंधित अधिकाऱ्यांचा संपर्क साधावा.