लहान मुलं घरात असली की घर कसं भरल्यासारख वाटतं.
गाेकुळ नांदतं हाे घरात!
मुलं म्हणजे किती निरागस असतात.
ही वाक्यं आता ज्येष्ठ नागरिकांच्या ताेंडीच कधीतरी ऐकायला मिळतात. आताच्या काळात मुलं घरात असली की, पालक आणि काहीवेळा आजी – आजाेबांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येते. ही “आताची पिढी” हा शब्द सातत्याने या ना त्या कारणाने ऐकायला मिळताे. आजची पिढी (लहान मुलं) खूप स्मार्ट आहेत. त्यांना सगळं येतं टेक्नाेलाॅजीमधलं. अशी काैतुकंही ऐकायला मिळतात. तर, आताची लहान मुलं ही काहीतरी वेगळी आहेत, या ना त्या कारणाने पालक, आजी – आजाेबा हे सातत्याने सांगत असतात.
पण, हा बदल आजचा, काही वर्षांमधला आहे, असे नक्कीच नाही. प्रत्येक दाेन पिढ्यांमध्ये हा बदल दिसून येताे. पणजाेबा – आजाेबा – बाबा आणि मुलगा अशा चार पिढ्यांचा विचार केला, तर प्रत्येक पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा प्रगतच हाेती. आत्ताच्या काळातही हेच घडतं आहे. पण, आता प्रत्येक गाेष्टीला एक्सपाेजर जास्त मिळत असल्याने, साेशल मिडीयामुळे हे सर्वांनाच प्रकर्षाने जाणवायला लागले आहे.
आत्ताच्या काळाप्रमाणे मुलांमध्ये बदल झाले आहेत, हे खरं असलं तरी निसर्गात मुलांमध्ये असणारे गुण, त्यांच्या वाढीचे टप्पे, त्यांच्या विकासाचे टप्पे आजही तसेच आहेत. मूलभूत गाेष्टींमध्ये बदल झालेला दिसून येत नाही. त्यामुळे आत्ताची पिढी हे गाेंडस नावं देऊन पालकत्व किती कठीण, तारेवरची कसरत असे म्हणण्यापेक्षा, काळानुरूप थाेडे बदल करून त्यांच्या वाढीचा, विकासाचा एक भाग हाेऊ या. चांगल्या पालकत्वाच्या युक्त्या (Best Parenting Tips) आत्मसात करू या. पालक हाेणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप आनंदाचा क्षण असताे. पालक एका दिवसात हाेता येत नाही. पालक हाेणे ही एक जर्नी आहे. आपण ही जर्नी आनंदाने एन्जाॅय करत पार करूया.
सर्वाेत्तम पालकत्वाच्या युक्त्या (Best Parenting Tips)
मुलांचा आत्मसन्मान वाढवा (Boost Your Child’s Self-Esteem) –
आता पाच वर्षांचाच आहे, त्याला कसली आली आहेत मतं? त्याला काय कळतंय? असं सहज म्हटलं जातं. पण, वयाच्या 5 व्या वर्षी मुलांमध्ये आत्मसन्मान निर्माण झालेला असताे. त्यामुळे मुलं स्वतःची मतं मांडतात, स्वतःची वेगळी ओळख आहे, हे त्यांना कळते. या वयात सातत्याने त्यांना कळत नाही, असे म्हणून त्यांच्या आत्मसन्मानाला नकळतपणे ठेचकाळले जाते. पण, याचा दुरगामी परिणाम हाेऊ शकताे. यामुळे 5 ते 11 वयाेगटातील मुलांना आत्मसन्मान देणे गरजेचे आहे. पाैंगडावस्थेतदेखील हा आत्मसन्मान सांभाळणे आवश्यक आहे. यामुळे मुलांची प्रगती, स्वप्रतिमा चांगली घडेल.
स्पष्ट आणि सकारात्मक संवाद (Clear and Positive Communication) –
मुलांशी संवाद साधला पाहिजे. मुलांना संवाद साधण्याची सवय ही लहान वयातच लागली पाहिजे. राेज वेळ काढून मुलांशी अवांतर विषयांवर गप्पा मारल्या पाहिजेत. मुलांशी संवाद साधताना नकारात्मक गाेष्टी टाळणे आवश्यक आहे. तुला कळत नाही, तुला जमणार नाही अशी वाक्यं वापरल्यास मुलं काेशात जाऊ शकतात. मुलांशी बाेलताना त्यांना चांगले वाटले तर ती पालकांशी माेकळेपणाने संवाद साधतील. सकारात्मक पद्धतीने मुलांना त्यांच्या चुका समजवून द्या. मुलांना खाेटी वचनं देऊ नयेत. खरी परिस्थिती मुलांना त्यांना कळेल, अशा भाषेत समजवली पाहिजे.
क्वाॅलिटी टाइम द्या (Make Time for Your Kids) –
दाेन्ही पालक नाेकरी, व्यवसाय करणारे असल्यामुळे मुलांना वेळ कसा आणि किती द्यायचा, हा नेहमीच प्रश्न त्यांच्यासमाेर असताे. वेळ देणे म्हणजे माॅलमध्ये फिरायला नेणे, हाॅटेलिंग करणे असा हाेत नाही. मुलांबराेबर असताना पूर्ण वेळ त्यांच्यासाठी असणे अपेक्षित आहे. मुलांबराेबर काही अॅक्टिव्हीटज प्लॅन करू शकता (उदा – पुस्तकं, लहान मुलांचं मासिक (Kids magzine) वाचणे, एखादा पदार्थ बनवणे, बागकाम करणे, खेळ खेळणे इ.) मुलांना काय हवं आहे, हे समजून घ्या, त्यांच्याबराेबर त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.
योग्य शिस्त लावा (Discipline) –
आयुष्यात शिस्त असणे ही महत्त्वाची बाब आहे. आजकाल हाेणाऱ्या टाइम, स्ट्रेस, मनी मॅनेजमेंटच्या क्लासेसची पाळंमुळं खाेलवर शिस्तीशी जाेडलेली आहेत. लहान वयापासून मुलांना याेग्य ती शिस्त लावणे गरजेचे आहे. अनेकदा मूल लहान आहे म्हणून त्याचे लाड केले जातात. मुलं 10, 12 वर्षांची हाेईपर्यंत त्यांचे अतिलाड केले जातात आणि त्यानंतर अचानक त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाताे. हे याेग्य नाही. लहान वयापासून मुलांना सहज संवादातून, समजावून शिस्त लावली पाहिजे.
स्वातंत्र्य देणे (Giving Independence) –
मुलांना स्वतःचे निर्णय घेण्यासाठी काही प्रमाणात स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. मुलांना सतत धाकात ठेवल्यास त्यांची निकाेप वाढ हाेत नाही. मुलांविषयी निर्णय घेताना त्यांच्याशी चर्चा करू शकता. मुलांना स्वातंत्र्य देणंही आवश्यक आहे. पण, त्याचवेळी स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक समजावला पाहिजे. मुलांमध्ये ही समज निर्माण करणेही आवश्यक आहे. मुलांना स्वातंत्र्य दिल्याने ती बिघडतील, किंवा स्वातंत्र्य दिल्यावर त्यांच्यावर संशय घेणे किंवा ते सातत्याने बाेलून दाखवणे हे देखील टाळणे तितकेच गरजेचे आहे.
पालकत्वाचा हा प्रवास सुकर आणि साेप्पा हाेण्यासाठी पालकांनी स्वतःमध्ये काही बदल करणे
आवश्यक आहे. पालकांनी काही चांगले गुण (Qualities of a Good Parent) अंगिकारणे आवश्यक आहेत. मुलांना वाढवताना ती फक्त लहान मुलं आहे, असा विचार करु नये. ती एक स्वतंत्र्य व्यक्ती आहे, असा विचार करून त्यांच्याशी बाेलल्यास काही गाेष्टी साेप्या हाेऊ शकतात. पालकांसाठी हा खूप खास सल्ला (Advice on Parenting) आहे. या गाेष्टी अंगिकारल्याने मुलांना आणि पालकांनाही हाेणारा त्रास कमी हाेऊ शकताे.
चिकूपिकू हे १ ते १० वयोगटातल्या मुलांचं पहिलंच मराठी मासिक आहे. माणसाच्या 8 बहुरंगी बुद्दीमत्तेवर आधारित असलेलं हे मासिक आहे. गाणी, गोष्टी आणि वेगवेगळे उपक्रम (activities) यांच्या अंतर्गत मुलांना एक वैविध्यपूर्ण अनुभव देणे हाच या मासिकाचा उद्देश आहे अधिक महितीसाठी अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. https://chikupiku.com
पालकत्वाचा सहज-सुंदर प्रवास: मुलांच्या वाढीसाठी सर्वोत्तम टिप्स (FAQs)
1. पालकत्व म्हणजे काय?
उत्तर: पालकत्व म्हणजे मुलांच्या शारीरिक, मानसिक, आणि भावनिक वाढीची जबाबदारी घेणे. त्यांना योग्य मार्गदर्शन देणे, समर्थन देणे, आणि प्रेम देणे ह्याचा समावेश आहे.
2. मुलांचा आत्मसन्मान कसा वाढवावा?
उत्तर: मुलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांचे विचार आणि भावनांना महत्त्व द्या, आणि त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. त्यांच्या लहानसहान यशस्वी प्रयत्नांचे कौतुक करा.
3. मुलांशी सकारात्मक संवाद कसा साधावा?
उत्तर: मुलांशी सकारात्मक संवाद साधण्यासाठी त्यांना ऐका, त्यांचे विचार आणि प्रश्नांना योग्य उत्तर द्या, आणि त्यांना नकारात्मक शब्दांनी बोलू नका. त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांच्या चुका समजवा.
4. मुलांना योग्य शिस्त कशी लावावी?
उत्तर: मुलांना योग्य शिस्त लावण्यासाठी नियमांची स्पष्टता द्या, त्यांना शिस्तीचे महत्त्व समजवा, आणि शिस्त लावताना तटस्थ आणि निष्पक्ष रहा. शारीरिक शिक्षा टाळा आणि संवादाचा वापर करा.
5. मुलांना वेळ देणे का महत्त्वाचे आहे?
उत्तर: मुलांना वेळ देणे महत्त्वाचे आहे कारण त्यांना तुमच्याबरोबर वेळ घालवून सुरक्षितता, प्रेम, आणि आपुलकी वाटते. वेळ देणे म्हणजे त्यांच्याबरोबर खेळणे, गप्पा मारणे, आणि एकत्रित उपक्रम करणे होय.
6. मुलांना स्वातंत्र्य देणे किती गरजेचे आहे?
उत्तर: मुलांना स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे कारण त्यांच्यामध्ये स्वयंपूर्णता, आत्मविश्वास, आणि निर्णयक्षमता विकसित होते. परंतु, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक त्यांना समजावणे आवश्यक आहे.
7. चांगले पालक होण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत?
उत्तर: चांगले पालक होण्यासाठी सहानुभूती, समजूतदारपणा, संयम, आणि समर्थन देणे हे गुण आवश्यक आहेत. मुलांच्या भावनांना आणि विचारांना महत्त्व देणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे देखील महत्त्वाचे आहे.
8. पालकत्वाचा प्रवास आनंददायी कसा करावा?
उत्तर: पालकत्वाचा प्रवास आनंददायी करण्यासाठी मुलांबरोबर वेळ घालवा, त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवा, त्यांच्या यशाचे कौतुक करा, आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. त्यांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना साथ द्या आणि त्यांच्याबरोबर शिकण्याचा आनंद घ्या.
9. मुलांचे तणाव कसे कमी करावे?
उत्तर: मुलांचे तणाव कमी करण्यासाठी त्यांच्याशी नियमित संवाद साधा, त्यांना खेळायला आणि आराम करण्यासाठी वेळ द्या, आणि त्यांचे विचार आणि भावनांना महत्त्व द्या. त्यांना ध्यान आणि योगासारख्या तंत्रांचा वापर शिकवा.
10. मुलांची चूक कशी सुधारावी?
उत्तर: मुलांची चूक सुधारण्यासाठी त्यांना प्रेमाने आणि सकारात्मक पद्धतीने समजवा. त्यांना त्यांच्या चुकीचा परिणाम समजवा आणि त्यांना चुकीच्या वर्तनाचे परिणाम भोगायला द्या. त्यांना योग्य मार्ग दाखवून पुढे जाण्यास प्रोत्साहन द्या.
Khup chaan mahiti 👍