“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान राबविण्याचा महत्वकांक्षी निर्णय दि.30.11.2023 रोजी शासनाने घेतलेला होता.
माझी शाळा सुंदर शाळा अभियान Details in Highlights
नाव | मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा |
सुरुवात | महाराष्ट्र शासन |
विभाग | शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य |
राज्य | महाराष्ट्र |
उद्देश | पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांच्या शाळेतील जबाबदाऱ्यांबद्दल शिक्षित करण्याचा |
Mode | Online |
कालावधी | दिनांक 01 जानेवारी, 2024 ते दिनांक 15 फेब्रुवारी, 2024 |
Official Website | https://education.maharashtra.gov.in/ |
- राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी
यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना
शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श
शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान राबविण्याचा महत्वकांक्षी निर्णय
दि.30.11.2023 रोजी शासनाने घेतलेला होता. - या उपक्रमातंर्गत राज्यातील एकूण 1,0,9,281 शाळांमधून शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी
मोठया संख्येने म्हणजेच 1,03,312 शाळांनी (95% पेक्षा जास्त शाळांनी) उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.
एकूणच या अभियानाच्या निमित्ताने शाळा, विदयार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण
निर्माण झाले आहे.
उपक्रमात सहभागी शाळांची एकूण संख्या-
सरकारी शाळांची एकूण संख्या | 64312 |
खाजगी शाळांची एकूण संख्या | 39000 |
शाळांची एकूण संख्या | 1,03,312 |
या उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थी संख्या –
मुलांची संख्या | 10464420 |
मुलींची संख्या | 9497166 |
एकूण विद्यार्थी संख्या | 19961586 |
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान Online Apply
नवीन अर्ज करण्यासाठी या वेबसाइट वर जा. – https://education.maharashtra.gov.in/
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची वैशिष्टे
- संपूर्ण अभियान पेपर लेस पध्दतीने संगणकीय प्रणाली द्वारे राबविण्यात आले .
- वीज बचत, आर्थिक साक्षरता,डिजिटल उपकरणाचा वापर,लोकशाही संसदीय मूल्यांचा वापर ,वैज्ञानिक दृष्टिकोण
विकसन याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. - शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा विषयक माहिती सरल पोर्टलव्दारे संगणकीय प्रणाली पध्दतीने नोंदविली.
- प्रधानमंत्री पोषण शक्ति अभियान अंतर्गत परसबाग विकसण , उर्वरित अन्नाची विल्हेवाट लावणे .
- मुल्यसंस्कार ,वृक्षसंवर्धन,वाडीलधाऱ्यांचा सन्मान करणे इत्यादी बाबींचा समावेश विशेष उल्लेखनीय
होता. स्वच्छता सवय शालेय जीवनात रुजविवण्यास यशस्वी झाली.
- प्रथम सर्व शाळांकडून भरलेल्या माहितीचे केंद्रशाळेच्या पातळीवरून मूल्यांकन करण्यात आले. शाळांचे
मूल्यांकन करण्यासाठी केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार
वेळापत्रक देण्यात आले होते व त्यानुसार कार्यवाही पूर्ण करण्यात आली. - सहभागी शाळांमधून सर्वोत्तम गुणांकन असणारी प्रथक क्रमांकावरील एक शाळा (प्रत्येक गटातून म्हणजेच
शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या गटातून प्रत्येकी प्रमाणे) तालुका पातळीवर मूल्यांकनासाठी ऑनलाईन
प्रणालीमार्फत पाठविण्यात आल्री. याच पध्दतीने जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर शाळांचे मूल्यांकनासाठी
कार्यपध्दती अवलंबण्यात आली आहे.10.त्यानुसार तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर गठित केलेल्या मूल्यांकन समित्यांकडून शाळांचे मूल्यांकन करुनशासकीय व खाजगी व्यवस्थापन गटातून प्रत्येकी प्रथम, द्वितीय व तृतीय शाळांची निश्चिती करण्यात आलेली आहे.( एकूण बक्षीस रक्कम रुपये सहासष्ट कोटी दहा लक्ष रुपये ) - राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी शाळांच्या प्रत्यक्ष निरीक्षणासाठी पाच विभागीय उपसमिती गठित करण्यात आलेल्या होत्या. या प्रत्येक उपसमितीने प्रत्यक्ष शाळा भेटी देऊन केलेल्या निरीक्षणानुसार प्राप्त झालेल्या मूल्यांकनाचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात केला.
- या उपसमितीच्या अहवालाच्या आधारे राज्यस्तरीय मूल्यांकन समितीकडून दिनांक 29/02/2024 रोजी
बैठकीचे आयोजन करुन राज्यस्तरावरील शाळांचे गुणांकन करण्यात आले आहे.
अ. सर्वसाधारण गट – आठ विभागामधून प्रत्येक गटातून एक याप्रमाणे एकूण 16 शाळा
ब. आब वर्ग मनपा – प्रत्येक गटातून एक या प्रमाणे 2 शाळा
क. बृहन्मुंबई महानगरपालिका – प्रत्येक गटातून एक या प्रमाणे 2 शाळा
अशा एकूण 20 शाळांचे दिनांक 29/02/2024 रोजी समितीकडून मूल्यांकन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत अंतिम निकाल
- अंतिम निकाल पाहण्यासाठी या वेबसाइट ला भेट द्या – निकाल
अधिक महितीसाठी किंवा अभियाना संबंधित कोणत्याही प्रश्न किंवा तक्रारीच्या बाबतीत, खाली दिलेल्या ईमेल वर संपर्क साधा:
Email ID : [email protected]
टीप – वरील संपूर्ण माहिती ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइट वरुण घेण्यात आलेली आहे अधिक माहितीठी येथे क्लिक करा.
माझी शाळा सुंदर शाळा अभियान
“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान राबविण्याचा महत्वकांक्षी निर्णय दि.30.11.2023 रोजी शासनाने घेतलेला होता.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान Online Apply
नवीन अर्ज करण्यासाठी या वेबसाइट वर जा. – https://education.maharashtra.gov.in/
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत अंतिम निकाल
अंतिम निकाल पाहण्यासाठी या वेबसाइट ला भेट द्या – निकाल
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान संपर्क कसा करावा?
Email ID : [email protected] , अधिक माहितीठी येथे क्लिक करा.