मतदान कार्ड काढा ऑनलाईन फ्री मध्ये 2024 | New Voter ID Card Apply Online Marathi

How To Apply For Voter ID Card | मतदान कार्ड काढा ऑनलाईन फ्री मध्ये 2024 :मतदार ओळखपत्र म्हणजेच, Voter ID Card किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही भारत सरकारने डिजिटल अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारच्या शासकीय सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देत आहे. या मध्ये राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचा हि सहभाग आहे. ते बनविण्यासाठी तुम्हाला अनेक वेळा कार्यालयात जावे लागते. यामागे अनेक कारणे असतात. अनेक वेळा तुमच्याकडे कागदपत्रे पूर्ण नसतात. अशात तुम्हाला त्रास देखील सहन करावा लागतो. पण, आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, असाही एक मार्ग आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला रांगेत उभे राहण्याची चिंता करावी लागणार नाही आणि तुम्हाला मतदार ओळखपत्र देखील सहज मिळेल. या पोर्टलद्वारे, तुम्ही मतदान ओळखपत्रांसाठी अर्ज करू शकता.

मतदान कार्ड काढा ऑनलाईन फ्री मध्ये 2024 | New Voter ID Card Apply Online Marathi
मतदान कार्ड काढा ऑनलाईन फ्री मध्ये 2024 | New Voter ID Card Apply Online Marathi

निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिकाला मतदान ओळखपत्र आवश्यक असते. 18 वर्षे पूर्ण झालेले भारतातील सर्व नागरिक मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. यासाठी केंद्र सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे, सर्व पात्र नागरिक मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. ज्या लोकांनी अद्याप मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी केलेली नाही ते सर्व लोक भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला मतदान ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करण्यासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत जसे की Voter ID ऑनलाइन अर्ज करणे म्हणजे काय, त्याचे फायदे, पात्रता, निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया इ.

यासाठी सोप्पी प्रोसेस फॉलो करावी लागेल आणि काही दिवसातच मतदार ओळखपत्र घरी येईल. जाणून घेऊया संपूर्ण प्रोसेस.

सर्वप्रथम आपण जाणून घेवूया की मतदान कार्ड साथी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत

मतदान ओळखपत्रासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे | Documents for Voter ID Card 2024

Voter ID Eligibility Criteria & Required Documents

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • हायस्कूल मार्कशीट
  • पत्त्यासाठी पुरावा
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे

मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया | Procedure To Apply Online For Voter ID Card in Marathi

स्टेप १: सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर https://voters.eci.gov.in जा, आणि Sign Up वर क्लिक करा. येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 1

स्टेप २: आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल, तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकून Send OTP वर क्लिक करा व पुढील सर्व माहिती अचूक भरून Register बटन वर क्लिक करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 2

(नोट – येथे I don’t have EPIC number वर क्लिक करा EPIC number हाच मतदान ओळखपत्र क्रमांक असतो. )

स्टेप ३: आता तुम्हाला एका नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल जिथे तुम्हाला Login करायचे आहे येथे तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाका.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 3

स्टेप 4: आता नवीन पेजवर, नवीन मतदार कार्ड नोंदणी करण्यासाठी New registration for general elector म्हणजेच डाव्या बाजूला Form 6 भरण्यासाठी त्यावर क्लिक करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 4

स्टेप 5: आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल, तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म अचूक आणि योग्य माहिती देवून भरायचा आहे.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 5

स्टेप 6: B. Personal Details मध्ये तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे Size 4.5 cm X 35. cm आणि 2MB पेक्षा कमी असावी. यामध्ये काही अडचण आल्यास आमचा हा लेख वाचा

New Voter ID Card Apply Online Marathi Step 6

स्टेप 7: पुढे G. Date of Birth details मध्ये देखील एक डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यावर तुमची जन्म तारीख असणे आवश्यक आहे (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, मार्कशीट ज्यावर जन्मतारीख आहे अशी इयत्ता १० / इयत्ता ८ / इयत्ता ५, जन्म प्रमाणपत्र)

New Voter ID Card Apply Online Marathi Step 7

स्टेप 8: पुढे H. Present Address Details मध्ये तुमच्या राहत्या पत्तायचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे यासाठी आधार कार्ड रहिवासी दाखला पण चालेल.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 8

स्टेप 9: I. Disability details मध्ये माहिती भरणे Optional आहे जर तुम्हाला Disability असेल तर त्याचे प्रमाणपत्र येथे अपलोड करावे लागेल.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 9

आता तुम्ही दिलेल्या सर्व माहितीचा एक फॉर्म तुमच्यासमोर येईल, तुम्ही तो पूर्ण चेक करा काही चुकीचे असल्यास Edit Form वर क्लिक करून तुम्ही चूक सुधारू शकता, जर पूर्ण फॉर्म बरोबर असेल तर Submit बटनावर क्लिक करा. आणि शेवट नवीन पेज वर, तुमचा फॉर्म यशस्वीरित्या नोंदणीकृत झाल्याचा मेसेज येईल.

हे देखील वाचा –

Free COVID-19 Test Kits: A Government Initiative to Combat the Pandemic

साइटिका: लक्षण, इलाज और उपाय | Sciatica 2024

प्रधान मंत्री कृषि सिंचाई योजना से जुड़ी खबरें 2024

महात्मा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण माहिती मराठी 2025

ही सर्व प्रोसेस झाल्यावर Submit बटन वर क्लिक करा आणि तुम्हाला एक Reference Number भेटेल जो भविष्यात तुम्ही तुमचे Application Track करण्यासाठी वापरू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही नवीन Voter ID मतदान कार्ड ऑनलाईन फ्री 2024 मध्ये अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर साधारण १५ दिवसामध्ये कागदपत्रे तपासणी होईल आणि मतदान कार्ड तयार झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाइल वर येईल, तुम्ही त्याच डॅशबोर्ड वर कार्ड तयार झाल्यानंतर त्याची डिजिटल कॉपी डाउनलोड करू शकता.

मतदान कार्ड कसे काढावे?

मतदान कार्ड तुम्ही घर बसल्या काढू शकता तेही फ्री मध्ये त्यासाठी आमचा हा लेख पूर्ण वाचा


मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र

मतदान कार्ड डाऊनलोड साठी या वेबसाइट वर जा https://voters.eci.gov.in/

मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड
बँक पासबुक
वाहन चालविण्याचा परवाना
हायस्कूल मार्कशीट
पत्त्यासाठी पुरावा
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे
अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे

Voter id card online application form 6

1 thought on “मतदान कार्ड काढा ऑनलाईन फ्री मध्ये 2024 | New Voter ID Card Apply Online Marathi”

Leave a Comment